*गंण गंण गणांत बोते चा गजर … श्री गजानन जय गजानन …. विदर्भाच्या सिमेवर श्री गजानन महाराजांच्या दिंडीचे आगमण. भक्तांची दर्शनासाठी गर्दी….

IMG_20170531_072438

बुलढाणा टुडे उपडेट -  सिंदखेडराजा तालुक्यात लगत असलेली विदर्भ व मराठवाडा सिमा. व याच समेवर म्हणजे च विदर्भात श्री गजानन महाराज यांच्या दिंडी व पालखीचे आगमन झाले आहे. पालखीचे आगमण होताच सिंदखेडराजा चे नगराध्यक्ष नाझेर काझी यांनी दिंडी चे स्वागत करुन. गजानन महाराज यांचे मनोभावे पूजा केली. दर्शन घेतले. यावेळी हजारो भक्तांनी श्री च्या दर्शनासाठी गर्दी केली. हि दिंडी परतीच्या प्रवासाला असुन विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या शेगाव येथून पंढरपूर ला रवाना झाली होती. आता परतीच्या प्रवासात हि दिंडी पालखि सह सिंदखेडराजात दाखल झाली आहे लहान मुलांपासून अबाल वृध्दाप्रयंत सर्व च भक्तांनी मनोभावे दर्शन घेतले. आज हि पालखी व दिंडी सिंदखेडराजा येथे मुक्कामी थांबणार आहे. व उद्या पुन्हा शेगाव कडे प्रस्थान करणार आहे. यावेळी अश्व. पालखी. व हजारो वारकरी याच्यां शिस्तीचे दर्शन घडले. सिंदखेडराजा भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पुलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता … या वेळी संपूर्ण वातावरण  गंण गंण गणांत बोते चा गजर .व  श्री गजानन जय गजानन   ने नामस्मरणमय झाले होते.                                                           

 

-->