*””पोरी जरा जपून” , प्रबोधनात्मक काव्यमय कार्यक्रम संपन्न*

_20180801_152742IMG-20180801-WA0007

खामगाव : टीव्ही जर्नालिस्ट असोसियशएन , गो से महाविद्यालय आणि खामगाव पोलीस उपविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा.विजयाताई मारोतकर यांचा “पोरी जरा जपून” हा प्रबोधनात्मक काव्यमय कार्यक्रम दि.1आँगस्ट 2018 रोजी गो से महाविद्यालयाच्या स्व. शंकरराव बोबडे सभागृहा मध्ये पार पडला .
स्मार्ट फोन आणि सोशल मीडियाचा होणार दुष्परिणाम या विषयावर महाविद्यालयीन युवतींना सखोल काव्यात्मक मार्गदर्शन विजया ताई नी केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गो से महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एस तळवणकर , प्रमुख अतिथी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील तर विशेष अतिथी म्हणून टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष राहुलपहुरकर होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल  पहुरकर यांनी ,परिचय डॉ बोचे मॅडम यांनी तर सूत्र संचालक कु. अमृता टिपकरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन संदिप वानखडे यांनी केले यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष अमोल गावंडे,सोशल मीडिया प्रमुख कुणाल देशपांडे ,प्रफुल्ल खंडारे,  राहुल खंडारे,शिवाजी भोसले,महेंद्र बनसोड,सूरज देशमुख,मुबारक खान, यांचासह टिव्ही जर्नालिस्ट संघटनेचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले

IMG-20180801-WA0008.

-->