**ब्रेकिंग ⚡⚡**शेगाव-**रेल्वे खाली कटून ३ महिला ठार १ गंभीर**

shegaonacc

ब्रेकिंग ⚡⚡

रेल्वे खाली कटून ३ महिला ठार १ गंभीर

शेगाव-  अधिक महिन्याची सेवटची एकादशी असल्याने गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी आलेल्या चार महिला रेल्वे खाली येऊन त्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 11 वाजेदरम्यान घडली.
याबाबत प्राप्त माहिती अशी की , अधिक महिन्याची शेवटची एकादशी असल्याने आज शेगावात श्री न च्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येत आहेत, त्यातच संपअसल्याने बसेस बंद असल्याने प्रवाश्यांना रेल्वेने प्रवास करावा लागत आहे . प्रवाशी जास्त असल्याने आज प्यासेंजर 2 तास लेट चालत होती . रेल्वेने प्रवासी मोठया संख्येने शेगावत येत आहे . आज सकाळी 11 वाजेदरम्यान भुसावळ- नरखेड प्यासेंजर ने भुसावळ कडून अनेक भाविक दर्शनासाठी शेगावला आले . गाडी प्यालटफॉर्म नंबर १ वर थांबली व प्रवासी उतरन निघून गेली . गर्दी जास्त असल्याने दादर्या वरून जाणे करता गर्दी झाली त्यामुळे काही प्रवासी रेल्वे रुळावरून प्लँटफ्रॉम २ वर जात होते , त्याच वेळी समोरुन येणाऱ्या चेन्नई- जोधपूर सुपरफास्ट एक्सप्रेस आली आणि सरिता विजय साबे वय ३0 रा. स्टेट बँकांच्या मागे नांदुरा
संगीता भानुदास गोळे वय 40 रा अलमपूर ता नांदुरा
चांदबाई शिवहरी तिसरे वय ४५ रा अलमपूर ता नांदुरा यांचे सह एक महिला  गाडी खाली आल्या, या अपघातात उपरोक्त तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

-->