*राजा गादीवर कायम, पाऊस सर्वसाधाराण, भेंडवळची भविष्यवाणी*बुलडाण्यातील प्रसिद्ध अशी भेंडवळची भविष्यवाणी *३०० वर्षा ची परंपरा *

1OK 2OK

बुलडाणा: शेतकऱ्यांसाठी हे वर्ष सर्वसाधारणच राहिल असं भाकीत भेंडवळच्या भविष्यवाणीतून करण्यात आलं. बुलडाण्यातील प्रसिद्ध अशी भेंडवळची भविष्यवाणी आज १९ एप्रिल रोजी जाहीर झाली.या घटमांडणी ला ३०० वर्षाची परंपरा  आहे.

राजा गादीवर कायम
महत्त्वाचं म्हणजे राजा गादीवर कायम राहील, असंही भविष्य यावेळी वर्तवण्यात आलं. घट मांडणीत पान विडा कायम राहिल्याने, हे भविष्य वर्तवण्यात आलं. पान विडा राज्याच्या गादीचं प्रतिक म्हणून पाहिलं जातं.यावेळेला पान विडा कायम असला तरी काहीसा सुकलेला होता. त्यामुळे राजा गादीवर कायम राहिल, मात्र त्याला काही संकटाना सामोरे जावे लागेल, असा त्याचा अर्थ आहे.
शेती सर्वसाधारण
यंदा राज्यात पाऊस सर्वसाधारण राहील. जनतेला दुष्काळाला सामोरं जावं लागणार नाही, अशी भेंडवळची भविष्यवाणी आहे. शेतकऱ्याचं उत्पादन सर्वसाधारण राहील. तसंच शेतमाल बाजार फारसे बदलणार नाहीत. शेतमालाच्या भावात खूप तेजी संभवत नाही,
पावसाचं भाकीत.

 

 • जून – साधारण पाऊस
 • जुलै – जूनपेक्षा जास्त पाऊस
 • ऑगस्ट – साधारण पाऊस, मात्र दुसऱ्या पंधरवड्यात जास्त पाऊस होईल.
 • सप्टेंबर – पाऊस कमी आणि लहरी राहिल
 • दुष्काळ संभवत नाही.

भेंडवळ पीकपाणी भाकित  

 • कापूस -उत्पादन सर्वसाधारण
 • ज्वार – सर्वसाधारण मात्र भावात तेजी शक्य
 • बाजरी – उत्पादन चांगले
 • तूर – साधारण पीक
 • मूग – साधारण पीक पण भाव तेजीत राहतील.
 • हरभरा – साधारण पीक
 • उडीद – साधारण पीक
 • तीळ – मोघम स्वरुपाचे उत्पादन
 • भादली – रोगराई राहिल
 • गहू – साधारण उत्पादन होईल
 • वाटाणा – सर्वसाधारण उत्पादन
 • शेतमाल बाजार फारसे बदलणार नाहीत, भावात खूप तेजी संभवत नाही
 • भेंडवळमध्ये भविष्यवाणी कशी केली जाते?
  भेंडवळची घट मांडणी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सायंकाळी करण्यात येते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी गावाबाहेरील शेतात घटाची आखणी करुन, त्यात घागर, मातीचे ढेकळे, पापड, पुरी, सांडोळी, कुरडी, पान आणि त्यावर सुपारी, गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ बाजरी, तांदूळ, अंबाडी, वाटाणा, सरकी, मसूर, करडी असे एकूण 18 प्रकारच्या धान्याची प्रतिकात्मक मांडणी केली जाते.पृथ्वीचे प्रतिकात्मक स्वरुपातील पुरी, समुद्राचं प्रतिक म्हणून घागर आणि त्यावर पापड, वडा, पावसाळ्याचे प्रतिक म्हणून मातीचे ढेकळे, वडा, पानसुपारी यांचीही मांडणी केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी घटमांडणीमधील बदलांचे निरीक्षण करुन भाकित वर्तवलं जातं.

-->