@टिळक राष्ट्रीय विद्यालयात डॉ बाबासाहेबांना अभिवादन@

IMG_20180414_082051

खामगाव दि 14 (BULDHANA_TODAY_UPDATE)

येथील ऐतिहासिक व सुप्रसिद्ध असलेल्या टिळक राष्ट्रीय विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव तथा मुख्याध्यापक डॉ पी आर उपर्वट होते. सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक डॉ उपर्वट  गिरी गुरुजी यांनी आपले विचार व्यक्त केलेत. याप्रसंगी जि. प. हायस्कुल, जळगाव ( जा ) येथून सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक भास्कर पुंडकर यांनी विद्यालयास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट दिल्याबद्दल त्यांचे पुत्र  येथील शिक्षक संदीप पुंडकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास जाधव गुरुजी, जारे गुरुजी, आडे गुरुजी, भगत गुरुजी, महाजन गुरुजी, पुंडकर गुरुजी , गावंडे गुरुजी यांचेसह  वामनराव हिवराळे, गजानन भगत, विठ्ठल ठाकरे  यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतलेत. 

 

-->