*श्री लाकडी गणपती खामगाव *भाविकांचे आराध्य दैवत*.. आज अंगारकी चतुर्थी ….

lakdee ganpatee

एकाच खोडामध्ये असलेली अडीच ते तीन क्विंटलची श्री गणेशमूर्ती भाविकांचे आराध्य दैवत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात खामगाव ही कापसाची मोठी बाजारपेठ होती. परिणामी खामगावात मोठमोठय़ा कंपनीच्या जिनिंग-प्रेसिंग होत्या. या जिनिंग-प्रेसिंगवर असणार्‍या अधिकार्‍यांचे जेवण करण्यासाठी दक्षिणेतील अय्या (आचारी) ठेवण्यात आले होते. या अय्यांचे रहिवासाचे ठिकाणावरून येथील फरशीनजीक असलेल्या सराफा भागाला अय्याची कोठी अशी ओळख निर्माण झाली. त्याकाळी म्हणजेच सुमारे १५0 वर्षांपूर्वी या अय्या लोकांनी एकाच खोडावर कोरीव काम करून तयार झालेल्या अखंड लाकडी गणेशाची स्थापना एका ओट्यावर केली होती. कालातरांने १९९५ मध्ये या मंदिराची रजिस्टर संस्था स्थापन होऊन विश्‍वस्त मंडळाकडून मंदिराचे निर्माण करण्यात आले. विशेष म्हणजे शहरातून निघणार्‍या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत अग्रभागी राहण्याचा मान या गणपतीला असतो. मिरवणुकीनंतर या गणेशाची मंदिरात पुन्हा स्थापना केली जाते.  आहेत.तर जात जात घेऊया दर्शन खामगाव चा लाकडी गणपती च गणपती बापा मोरया ,

-->