@महिला दिनानिमित्त ग्रामीण महिलांची ब्रेस्ट कँसर तपासणी मोफत शिबीर @ खामगाव येथील विजयलक्ष्मी पेट्रोल पंप चा स्तुत्य अभिनव उपक्रम..@

314

बुलढाणा-टुडे ( अमोल सराफ)-ग्रामीण भागातील महिला ब्रिस्ट कैंसर, गर्भाशय कँसर ची तपासणी करुन त्याचा उपचार करू शकत नाही  किंवा पैशा अभावी त्याचे निदान ही करू शकत नाहीय.. तर बहुतांश वेळी त्यांना याची माहितीच नसते…  त्यामुळे त्यांना कँसर सारखे रोग होतात… म्हणून खामगाव येथील विजयलक्ष्मी पेट्रोल पंप चे चालक एन टी देशमुख यांनी त्यांच्या पेट्रोल पम्प वर रोटरी क्लब अमरावती , खामगाव व  पंजाबराव देशमुख मेमोरियल ट्रस्ट ची तपासणी व्हेन आणि तज्ञ डॉक्टर ची चमू बोलावली असून आज ( ८ मार्च) दिवसभर ग्रामीण भागातील महिलांची मेमोग्राफी तपासणी, गर्भाशय कँसर तपासणी करण्यात आलीय… जिल्ह्यात कुठल्या ही पेट्रोल पम्प धारकाने सामाजिक दृष्टिकोनातून ग्रामीण महिलांची निशुल्क ब्रिस्ट कँसर तपासणी कार्यक्रम प्रथमच आयोजित केला असून स्तुत्य उपक्रम राबविला ..आज सकाळपासूनच  ही तपासणी मोहीम सुरू झालीय असून या मध्ये 100 महिलांची वर तपासणी केल्या गेलीय… आणि या तपासणी चा अहवाल ही त्यांना यांना देण्यात येईल आणि पुढील निदान करणे ही सोपे होणार आहे…. या अभिनव उपक्रमा मुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांचा चांगला फायदा होणार आहे… एव्हढे मात्र नक्की…. 

 

-->