*उत्सव संस्कृतीचा…वसा आरोग्य सेवेचा … लोकार्पण विकासकामाचे … समाधान अन्नदानाचे… — सालईबनात रंगला सातपुड्यातील आदीवासींचा #फगवा…..

2 1

रविवारी ४ मार्च ला सातपुड्यातील #सालईबन येथे फगवा उत्सव उत्साहात साजरा झाला.  या उत्सवाचं महत्वाचं वेगळेपण असं कि एकाच वेळी संस्कृतीचे पुनरुज्जीवन, विकासकामांचे लोकार्पण,  आरोग्य सेवा, अन्नदान आणि ज्ञानदानाचा एकत्र सोहळा पार पडला.  #आमदार #डॉ.संजय #कुटे यांच्या हस्ते लोकार्पण तर आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत समारोप झाला. सोबतच या भागातील सरपंच, जि. प. सदस्य, पं. सं. सभापती आदी लोकप्रतिनिधींची उपस्थिती आवर्जून होती.महात्मा गांधी लोकसेवा संघाच्या मालकीच्या या भुदानच्या जमिनीवर तरुणाई फाउंडेशन च्या पुढाकाराने वडपाणी ग्रामस्थांच्या सहकार्याने संपन्न झालेल्या “सालईबन” च्या सोहळ्याची चित्रमय व शब्दमय झलक भारतीय संस्कृतीचे जतन आपल्या उत्सव साजरा करण्याच्या पद्धती फार बदलत चालल्या आहेत. होळी रंगपंचमी म्हटली वृक्ष तोडून पर्यावरणाचा नाश, व्यसने, केमिकल रंगाचा वापर, कर्णकर्कश आवाजावर धांगडधिंगा  असं विकृत स्वरूप झालं आहे. परंतु आपले भारतीय सण उत्सव हे जर पूर्वी ज्या निसर्गानुकूल पद्धतीने साजरे होत असत तसे आता पुन्हा व्हावेत असे प्रकर्षाने वाटतं.  #तरुणाई फाउंडेशन ने आपल्या ह्याच चांगल्या रूढी परंपरांना मूळ रूपात समाजसमोर आणायचं ठरवलं आहे. सालईबन येथे आपल्याच आदिवासी बांधवांच्या होळी (फगवा) उत्सवाचं आयोजन ३ वर्षांपासून होत आहे. नृत्य, कसरत, हाताने बनविल्या ढोल, बासरी सारख्या वाद्यांचा सुरेल आवाजात येथे हा सुंदर सोहळा पार पडला. सातपुड्यातील पावरा, भिलाला, निहाल, कोरकू, भिल्ल या  जनजातींचे सुमारे अडीच हजार आदिवासी यात सामील झाले. वडपाणी, बांडा पिपल, चालठाणा, भिंगारा, गोमाल, चालीसटापरी, गोरखनाथ, उमापूर, चारबन, मेंढामारी, कुंवरदेव, आमपाणी, सोनबर्डी, वसाडी, हड्यामाल, अंबाबारवा, आमल्यापाणी हि आदिवासी गावं यात सहभागी होती. या निमित्तानं त्यांच्यातील कला गुणांना वाव आणि लोप पावत चाललेल्या आदिवासी संस्कृतीचं जतन हा उद्देश सफल झाला. आदिवासी गावासाठी पाणी पुरवठा केवळ संस्कृतीचे रक्षण करणं एवढंच काम करून भागणार नाही त्यांच्या साठी मूलभूत सुविधा मिळायला हव्याच. म्हणून सालईबनातून वडपाणी या गावापर्यंत पाणी पुरवठा योजनेचं लोकार्पण करण्यात आलं. यासाठी सुनगाव ग्रामपंचायतने पुढाकार घेतला. तर पाईप टाकण्यासाठी वडपाणी ग्रामस्थांनी श्रमदान केलं व लोकवर्गणी हि जमवली. तरुणाई फाउंडेशन आणि सालईबन ने आपला वाटा उचलला. स्वातंत्र्यकाळा नंतर प्रथम या गावात पाणी पुरवठा झाला आहे मागील वर्षी याच गावकऱ्यांनी श्रमदानातून रस्ता बनविला होता हे विशेष ( आधी  इथे जाण्यासाठी रस्ता नव्हता. फक्त पायवाट होती ). अश्या या पाणी पुरवठा योजनेचे व पाणी टाकीचे लोकार्पण याच दिवशी करण्यात आले आदिवासींची आरोग्य सेवा सातपुड्यातील आदिवासी बांधवांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यासाठी तरुणाई सातत्याने ३ वर्षांपासून सेवाभावी डॉक्टर्स मंडळींच्या सहयोगातून अनेक शिबिरं घेत असते. या उत्सवाच्या निमित्ताने जमलेल्या आदिवासीं पैकी १ हजार स्त्री पुरुषाची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार करण्यात आले. यासाठी अकोला येथील सुप्रसिद्ध किडनीरोग तज्ञ् डॉ. सदानंद भुसारी व त्यांच्या सेवाभावी टिमने हि जबाबदारी स्वीकारली. वैद्यकीय क्षेत्रातील २५ तज्ञ् या सेवेसाठी तत्पर होते. सोबत गंभीर पेशन्टसाठी रुग्णवाहिका हजर ठेवली होती.  सोहळ्यासाठी सातपुड्यातील दुर्गम भागातून पायी चालत आलेल्या सर्व आदिवासी बांधवांना तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणावरून आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना सालईबन परिवाराने कुद्री (मसाला भात) व बुंदी चे अन्नदान केले.  परिसरातील आदिवासींच्या काही सुशिक्षित मुलांसाठी “बाल वाचनालयाची” सुरुवात हि याच दिवशी झाली. अकोला येथील शुभंकरोती फाउंडेशन ने यासाठी पुढाकार घेतला आहे. या निमित्ताने आलेल्या आदिवासी बांधवांच्या आनंदात जळगाव जा . चे आमदार डॉ. संजय कुटे,  बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह सर्वोदय मंडळ महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री ठाकूर काका, जी. एस. टी डेप्युटी कमिश्नर तेजराव पाचारणे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ पाटील, अमरावती विद्यापीठाच्या NSS चे समन्वयक डॉ. राजेश मिरगे, सुनगाव च्या सरपंच सौ. विजयाताई पुंडलिक पाटील,  जि. प. सदस्यपती अशोकराव काळपांडे, पं. स. सभापती पती नाज्यासींग बोण्डल यांच्यासह  अनेक मान्यवरांची हि आयोजनाच्या पूर्णत्वाची खात्री देऊन गेली  सर्वात ठळकपणे सांगायची गोष्ट म्हणजे या सर्व आयोजनासाठी श्रमदानाचे महत्वाचे काम वडपाणी, चाळीसटापरी, बांडापिपल येथील सालईबन च्या युवा आदिवासी कार्यकर्त्यांनी केले. एकाच दिवशी #संस्कृती, #सेवा, #ज्ञान, #विकास असा सर्वांग सुंदर सोहळा सालईबनात पार पडला  पुढच्या वर्षीच्या सोहळ्यासाठी आपण सारे आमंत्रित आहात. आपणही “सालईबन” च्या कार्यात कधीही सहभागी होऊ शकता…  जबाबदारी पार पाडू  शकता…. सेवेचा आनंद घेऊ शकता .
- सालईबन परिवार

 

 

-->