*शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी राज्य शासन तत्पर*–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

CM2

CM1CM3

बुलडाणा, दि. 17 : राज्य शासन बळीराजाच्या उत्थानासाठी विविध योजनांच्या माध्यमातून कार्य करीत आहे. उन्नत शेती व समृद्ध शेतकरी करण्यासाठी शासन अभियान राबविण्यात येत आहे. कर्जमाफी, गटशेती, ठिबक सिंचन, थेट लाभ हस्तांतरण, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे अशा अनेक योजना राज्य शासनाने अंमलात आणल्या आहेत. अशाप्रकारे राज्य शासन शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी तत्पर आहे. त्यामुळे निश्चितच राज्यातील शेतकरी समद्ध होणार आहे, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.   खामगांव येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या मैदानावर बुलडाणा जिल्हा कृषि महोत्सव 2018 चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनीय कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे कृषि मंत्री तथा पालकमंत्री पांडुरंग फुंडकर, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, जि.प अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, खासदार प्रतापराव जाधव, रावेरच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, आमदार सर्वश्री डॉ. संजय कुटे, डॉ. संजय रायमूलकर, डॉ. शशिकांत खेडेकर, आकाश फुंडकर, मुंबईचे आमदार आशिष शेलार, जि.प सभापती श्रीमती श्वेताताई महाले, विभागीय आयुक्त पीयुष सिंग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगूरू डॉ. विलास भाले,  फलोत्पादन विभागाचे संचालक प्रल्हाद पोफळे, माजी आमदार धृपदराव सावळे, नगराध्यक्षा श्रीमती अनिताताई डावरे, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन आदींसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

-->