*गोष्ट एका भव्य -दिव्य महाप्रसाद पंगतीची . . . . . . *बुलढाणा -टुडे- विशेष *

2

1

बुलढाणा -टुडे- विशेष -  शंभर पंक्ती त्यांना वाढणारे शंभर टेक्टर प्रत्यके टेक्टर मध्ये पुरी भाजी चे ढीग मोठमोठे पातेले आणि एक साथ  लाखो भाविकांना वाढणारे चार हजार स्वयंसेवक हा आहे बुलढाणा जिल्हयाच्या हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रमाचा अत्यंत लोकप्रिय अत्यंत भव्य दिव्य महाप्रसाद अत्यंत शिस्तीने उंचच प्रतीचे व्यस्थापनाचा परिपाकच आहे जिथे तीन लाखांच्या वर जनसमुदाय एकत्र एक साथ बसून जेवण करता अगदी शांततेत हा चमत्कार गेल्या ५३ वर्षा पासून घडतोय हिवरा आश्रम इथे. हे आहे बुलढाणा जिल्हयाचे विवेकानंद आश्रम हिवरा आश्रम या ठिकाणी दरवर्षी पंचांगा च्या अनुसार विवेकानंद यांचा जन्मोत्सव साजरा  करण्यात येतो आश्रमाचे संस्थापक स्व शुकदास महाराज यांनी ५३ वर्षा पूर्वी इथे हा उत्सव सुरु केला जो आज पर्यंत अव्याहत सुरु आहे तीनदिवसिय चालणार्या या उत्सवात भरपूर कार्यक्रमांची रेलचेल असते इथे अध्यात्म ज्ञान सामाजिक शैक्षणिक या विविध कार्यक्रमांची मेजवानी असते राजयातूनच नव्हे तर देशभरातून इथे या उत्सव काळात भाविक भक्त हिवरा इथे जमत असतात .यंदा देखील पौष वाद्य पंचमी ते सप्तमी म्हणजेच ६,७,८ जानेवारीला हिवरा आश्रम या ठिकाणी विवेकानंद जन्मोत्सव चे आयोजन  केले गेलॆ होते या वेळी ६ तारखेला उत्सवाचे उद्घाटन विवेकानंद विचार साहित्य संमेलन छाया उद्घाटनाने केल्या गेले तीन दिवस हे साहित्य संमेलन इथे सुरु राहिले या माध्यमाने विवेकानंद यांच्या विचार आणि साहित्याचे दर्शन विविध संत महात्मे यांनी प्रवचन आणि भाषणातून करून दिले बिद्धिवंतांचा आणि भाविकांचा असा दोघान्चा संगम यातून घडवला गेला स्वामी श्रीकांत नंद जी रामकृष्ण मिशन यांनी याचे उद्घाटन केले तर अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले.शेवटच्या दिवशी सर्वात महत्वाचा आणि महोत्सवाचा आकर्षणाचा कार्यक्रम म्हणजेच महाप्रसादाचा कार्यक्रम ज्याचे मेनू असतो पुरी आणि भाजी जी एक दिवस अगोदर तयार केलाय जाते ती बनवण्यासाठी कुणी आचारी नसतो अथवा कारागीर नसतो तर सर्वानी मिळून तो बनवला जातो स्व शुकदास महाराज यांनी ५३ वर्षा पूर्वी सुरु केलेली हि परंपरा आज भव्य स्वरूप धारण करत आहे यंदा दोनशे क्विंटल गव्हाची पुरी आणि तेवढीच वांग्याची भाजी यंदा बनवली गेली चार हजार स्वयंसेवक यांनी ४८ तास अखंड मेहनत करून ही पुरी भाजी बनवली जिचे आज शंभर टेक्टर द्वारे वाटप करण्यात आले शंभर पंक्तीत पानास पुरुष आणि स्त्री अश्या पंक्तीत तीन लाख भाविक मोठ्या गुण्या गोविदयाने जेवलेत कुठे कसला आवाज आहि तर कुठला गोंधळ नाही प्रत्यके पंक्तीत धूप उदबत्ती लावून प्रत्येकाला गंध टिळा लावून पाने वाढून पोटभर जेवू घातले गेलाय ५३ वर्षा पासून हा सोहळा अव्याहत पणे सुरु असून याची ग्रिनीज बुकात नोंदणी करण्याचा प्रयत्न संस्थान करीत आहेत  शुकदास महाराज यांचे गेल्या वर्षीच निधन झाले त्या मुळे या वर्षी दुःखाचा सावट असले तरीही इथे येणाऱ्या भाविकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. एक साथ तीन लाख लोक कुठलीही जातीभेद नाही कुठलीही गरिबी श्रीमंती नाही सगळेजण एक सामान आणि हे जेवण झाल्यावर अगदी काही वेळातच त्या मोकळया मैदानावर कुठलीही घाण पत्रावळी किंवा अन्न उरत नाही तो पूर्ण मैदान संपूर्ण स्वच्छ करण्यात येतो आणि कचरा तिथेच जाळून नष्ट करण्यात येतो हा प्रकार म्हणजे एक अभिनव आहे तर तीन दिवस मोठी यात्रा परिसरात भरते तिथे विविध दुकाने साहित्य विक्री दुकाने लहान मुलांच्या मनोरंजाचे मोठं मोठे झोके छोटे झोके वेगवेगळे खेळ खाद्य वस्तू यांची रेलचेल असते जी सर्वासाठी मोठी पर्वणी असते आज या यात्रा उत्सवाची सांगता स्वच्छता मंत्री बबन राव लोणीकर यांच्या उपस्थितीत आणि विविध मान्यवरांच्या हजेरीने महाप्रसादाने संपन्न झाली. 

2 1

-->