*विद्यार्थ्यांना दिले मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण- टिळक राष्ट्रीय विद्यालयाचा अभिनव उपक्रम —*

elc

elc

खामगाव दि 26—बुलढाणा टुडे उपडेट
येथील ऐतिहासिक व प्रसिद्ध असलेल्या टिळक राष्ट्रीय विद्यालयात विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण शिक्षक अरुण भगत यांनी दिले. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभर कश्या पद्धतीने चालतो याचे संपूर्ण प्रशिक्षण निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून मॉक ड्रिल पद्धतीने देण्यात आले. यामध्ये सरपंच अर्थात वर्गप्रमुखासाठी व विविध पदासाठी आरक्षण निहाय उमेदवारी अर्ज भरण्यात आले. त्यानंतर अर्जाची छाननी करून अंतिम यादी लावण्यात आली. तसेच मतदारांची यादी हजेरी पटावरील क्रमांकानुसार बोर्डवर लावण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा केंद्राध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक डॉ पी आर उपर्वट यांनी काम केले तर मतदान अधिकारी म्हणून गिरी गुरुजी, महाजन गुरुजी, भगत गुरुजी यांनी काम केले. मतदार यादीतील क्रमांक शोधणे, स्वाक्षरी करणे, शाही लावून घेणे, मतदान कक्षात जाऊन योग्य उमेदवाराच्या नावासमोर शिक्का मारणे, मतपत्रिका घडी करून मतदान पेटीत टाकणे, ई सर्व प्रक्रियेचे प्रशिक्षण या विद्यालयातील वर्ग 6 च्या विद्यार्थ्यांना देण्यात आले. कारण ते सुज्ञ नागरिक झाल्यानंतर त्यांना योग्य उमेदवार निवडता यावा, हा त्यामागचा उद्देश असल्याचे निवडणूक कार्यक्रमाचे आयोजक शिक्षक अरुण भगत यांनी सांगितले. डॉ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात येऊन निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला तो असा,विद्यार्थ्यनमधून सरपंच तथा वर्गप्रमुखपदी कु.सिमरन परविन शे.अकबर निवडून आली तर रामचंद्र मदारीवाले हा उपसरपंच पदी निवडून आला.तर साक्षि विनोद माळगण ,संजना राजू सावरकर, चंचल तुलशीराम मदारीवाले,प्रिती अनिल हिवराळे, सर्व महिला राखीव.शिवांश देविदास सोळंके एस.टी राखीव तर शे.राहिल शे.रफीक सर्वसाधारण व
रितेश विलास वाकोडे एस.सी.राखीव मधून निवडून आले. तर पोलिस म्हणून पवन कोळपे याने काम केले.

 

 

-->