*शालेय जीवनातूनच बनतात भविष्यातील वैज्ञानिक– इंजि. सुरवाडे*

ok

खामगाव दि 21(बुलढाणा टुडे उपडेट )
येथील ऐतिहासिक व प्रसिद्ध असलेल्या टिळक राष्ट्रीय विद्यालयात विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा या करिता  21 डिसेंबर रोजी  करण्यात आले होते. या प्रदर्शनीचे उदघाटन सेनि. इंजिनियर जे. एस . सुरवाडे यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव सुधाकर दादा अजबे होते . तर प्रमुख उपस्थिती मुख्याध्यापक डॉ पी. आर. उपर्वट यांची होती. या विज्ञान प्रदर्शनामध्ये 30  उपकरणांची मांडणी करण्यात आली होती व यामध्ये 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.  सर्वप्रथम पंधे गुरुजींच्या समाधीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी  बोलतांना सुरवाडे म्हणाले की,” शालेय जीवणातूनच भविष्यातील वैज्ञानिक निर्माण होत असतात म्हणून विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी व संशोधन करावे” यावेळी सुधाकर दादा अजबे व मु अ डॉ उपर्वट यांनी आपले विचार मांडलेत. कार्यक्रमाचे संचालन विज्ञान शिक्षक संजय जारे  यांनी तर आभार प्रदर्शन महाजन यांनी केले. त्यानंतर वर्गनिहाय विद्यार्थ्यांना प्रदर्शनी पाहण्यास खुली करण्यात आली. विजयी स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयोगशाळा परिचर गावंडे व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतलेत.

 

-->