*कार्तिकी एकादशी उत्सव निमित्त शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरामध्ये भाविकां ची मांदियाळी ……

uvs171031-001

uvs171031-001

आषाढी कार्तिकी  विसरू नका मज .. संगत असे गुज पांडुरंग… या अभंग ओवीला अनुसरून बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव संत गजानन महाराज  संस्थानच्या वतीने कार्तिकी एकादशी निमित्य शेगाव येथे  नगर परिक्रमा (शोभायात्रा) काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये वारकरी व भक्तगण सहभागी झाले होते.  आषाढी व कार्तिकी एकादशी उत्सव दरवर्षी शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरामध्ये साजरा करण्यात येतो. आज ३१ ऑक्टोबरला कार्तिकी एकादशी निमित्य राज्यभरातून हजारो भाविक आणि वारकरी भजनी दिंड्या शेगावमध्ये दाखल झाले होत्या .  दुपारी २ वाजता  गजानन महाराजांच्या रजत  मुखवट्याची शेगाव संस्थांचे विश्वस्थ निळंकंठ पाटील यांनी विधीवत पूजा केली. त्यानंतर टाळमृदुंगाच्या निदानात पांडुरंगाचे आणि गजाननाचे नामस्मरण करत या नगर परिक्रमा (शोभायात्रेला) पालखीला सोहळ्याला  सुरुवात झाली. रथ, मेणा, अश्व, गजसह शेकडो वारकरी या परीक्रेमेमध्ये सहभागी झाले होते. तर सायंकाळी रिगन सोहळ्याने या नगरपरिक्रमेचा समारोप होतो या नागरपरिक्रमेत भाविकभक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होतात. कार्तिकी एकादशी निमित्य राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी गजानन महाराजाचे दर्शन घेतले शेगावला मंदियालीचे स्वरूप प्राप्त झाले होते.  जे भक्तगण कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाऊ शकत नाही ते भक्त शेगाव येथे येऊन गजाजन महाराजाच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतात.  तर गजाजन महाराज संस्थांच्या वतीने सुद्धा कार्तिकी एकादशी निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.  

-->