* जय गजाननाच्या गजरात ‘श्रीं’ च्या पालखीचे शेगावात स्वागत* पालखी सोबत लाखो भाविकांची खामगाव ते शेगाव पायी वारी —*

uvs170531-003

11IMG_20170531_072438+she

शेगाव- बुलढाणा टुडे -उपडेट गेल्या दोन महिन्यांपासून आषाढी एकादशीवारीसाठी गेलेली ‘श्रीं’ची पालखी मंगळवारी शहरात परतली. श्रींची हि पालखीचे रविवारी सकाळी ११.३० वा. संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकर पाटील यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलेल्यांनी ‘श्रीं’च्या रजत मुखवटय़ाचे पूजन करून दर्शन घेतले.यावेळी खामगाव शेगाव मार्गावर पालखी सोबत जिल्ह्यातील  भाविकांनी हजेरी लावली होती.  ३१ मे रोजी ‘श्रीं’ची पालखी शेगाव येथून पंढरपूरसाठी रवाना झाली होती.विठ्ठलाच्या भेटी नंतर हि पालखी  ३० जुलै रोजी शेगाव येथे आगमन झाले. यावेळी श्री गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांनी श्रींच्या पालखीचे दर्शन घेतले.   श्रींची पालखी महाविद्यालय परिसरात पोहचल्यानंतर वारकर्‍यांना भेट वस्तू देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर निळकंठदादा पाटील यांनी श्रींच्या रजतमुखवट्याचे पूजन केले. शेगाव शहराच्या मुख्य मार्गाने पालखी मिरवणुकीला दु. २ वा. सुरुवात करण्यात आली. श्रींच्या पालखीच्या स्वागतासाठी मुख्य मार्गावर ठिक़ठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. श्रींच्या पालखीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. सायंकाळी पालखी मंदिरात पोहचली.यावेळी कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या उपस्थित श्रींच्या रजतमुखवट्याचे पूजन व महाआरती विश्‍वस्त निळकंठदादा पाटील यांच्याहस्ते करण्यात आली. यावेळी वारीत सहभागी टाळकर्‍यांचा रिंगन सोहळा पार पडला. दुपारी अडीच वाजता ‘श्रीं’ची पालखी ज्ञानोबा तुकाराम, गजानना अवलिया नामघोष करीत तहसील कार्यालय, रेल्वे स्थानक, अग्रेसन चौक, शिवाजी चौक, गांधी चौक, मंदिर परिसरात पोहोचली. अभंग व पावली, गोलरिंगण झाल्यानंतर ‘श्रीं’च्या पालखीची महाआरती करण्यात आली. शहरातील सेवाभावी संस्था ,शासकीय कार्यालय, पतसंस्था यांच्याकडून ठिकठिकाणी चहापाणी, फराळ, विविध वस्तुंचे वितरण करण्यात आले.हा सोहळा पाहण्यासाठी शेगावसह बाहेरगावच्या भक्तांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. यावेळी श्री गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष डॉ.रमेशचंद्र डांगरा निळकंठदादा पाटील, श्रीकांतदादा पाटील, शरद शिंदे, तहसीलदार गणेश पवार, मुख्याधिकारी अतुल पंत, नारायणराव पाटील, गोविंद कलोरे, अशोकराव देशमुख, विश्‍वेश्‍वर त्रिकाळ, राजेंद्र शेगोकार, प्रकाशबाप्पू देशमुख, आदी उपस्थित होते. जय गजाननाच्या गजरात ‘श्रीं’च्या पालखीचे शहरात ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले.  जिल्हाभत्रातील लाखो भाविकांनी पालखी सोबत पायदळ वारी केली. खामगाव येथून पायदळ आलेल्या भाविकांना संस्थानच्यावतीने वाटिका येथे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. ‘श्रीं’च्या पालखी मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या. ‘श्रीं’च्या पालखीत अश्व, गजासह ५०० वारकरी, २५० सेवक व भाविकांसह सहभागी झाले. हातात टाळ मृदुंग व भगवा पताका घेतलेले आणि पांढरे शुभ्र कपडे परिधान केलेले वारकरी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. यावर्षीच्या पालखीचे वैशिष्टय़ म्हणजे खामगाव ते शेगाव १६ किलोमीटपर्यंत अखंड असा भाविकांचा मेळा रस्त्याने फुललेला होता. दरवर्षी हजारोच्या संख्येने जिल्ह्यातील भाविक पालखीसोबत खामगाव ते शेगाव पायीवारी करीत असल्याने शहरात होणारी गर्दी पाहता पोलिस प्रशासनाने शहरातील वाहतुकीत मोठे बदल केले होते. तर पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला.

-->