*जिल्ह्यात सरासरी 11.9 मिलीलीटर पावसाची नोंद* चिखली तालुक्यात सर्वात जास्त 33 मि.ली. पाऊस

rain

rain

बुलडाणा, दि. 14 -  गत दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या काही भागात वरूण राजा बरसत आहे. सार्वत्रिक पाऊस नसला, तरी काही तालुके वगळता बऱ्याचशा तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्यांनी वेग घेतला असून शेतकरी पेरण्यांमध्ये व्यस्त आहे. कमी-अधिक प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे टाकलेले बियाणे जमिनीवर येताना दिसत आहे.  जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार पावसाची नोंद खालीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आतापर्यंत पडलेल्या पावसाची – बुलडाणा : 26 मि.ली (339 मि.ली), चिखली : 33 (260), दे.राजा : 8 (184), मेहकर : 17 (297), लोणार : 7 (231), सिंदखेड राजा : 6(229.6), मलकापूर : 9 (154), मोताळा : 10 (227), नांदुरा : 5.5 (261.5), खामगांव : 17.8 (209.4), शेगांव : निरंक (133), जळगाव जामोद : 12 (237) आणि संग्रामपूर : 3 (116 मि.ली) पावसाची नोंद करण्यात आली. आतापर्यंत सर्वात जास्त पाऊस बुलडाणा तालुक्यात झाला असून सर्वात कमी पाऊस शेगांव तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 11.9 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

 

-->