* गण गण गणात बोते च्या गजरात दुमदुमली पंढरी , शेगाव मध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी ..*

P2 C AMOL1

palkhee photo

बुलढाणा – शेगाव -बुलढाणा टुडे उपडेट - विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव मध्ये आज आषाढी एकादशी निमित्त संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी जमली होती ….तर जे पंढरपूर ला जावू  शकत नाहीत, त्यांनी संत गजाननांच्या नगरीत येवून  महारांजाचे दर्शन घेतलेय …  भाविकांच्या म्हणण्यानुसार  या  दर्शनाला पंढरपूर च्या विठ्ठलाच्या दर्शनाचेच महत्व असल्यामुळे आज आषाडी निमित्ताने संत नगरी शेगावात लाखो भक्तांची  मांदियाळी जमली होती…. राज्यातून लाखो भाविक  शेगावात  दाखल झाले होते ….म्हणूनच शेगाव ला प्रति पंढरपूर म्हणून ही ओळखल्या जातेय . श्री संत गजानन महाराजांच्या शेगाव मध्ये पारंपरीक पालखी सोहळा पार पडलाय … यामुळे संपूर्ण पंढरीच अवतरली की काय असे दृश्य वाटत होते … आषाढी निमित्त जे भाविक पंढरपूर ला जाऊ शकत नाहीय त्या भाविकांनी शेगाव ला येऊन गजानन बाबांचे दर्शन घेतलेय … शेगाव मध्ये गजानन बाबांचे लाखो भाविकांनी  दर्शन घेतलेय असून या भाविकांच्या गर्दीमुळे ” गण गण गणात बोते” च्या गजरात  शेगाव नगरी दुमदुमली होती… एकीकडे शेगाव चे गजानन बाबांचे मंदिर  भजन, कीर्तन व हरिनामाने  भक्ती ने न्याहुन निघाला होता … तर दुपारी अश्व , गज ,टाळ, मृदुन्ग च्या गजरात  पालखी ची नगर परिक्रमा निघाली होती  त्यात लाखो भाविक सहभागी झाले होते  …- महाराजांच्या पंढरीत आषाढी एकादशी यात्रा सोहोळा पाहणायसाठी  लाखोच्या वर भाविकांच्या गर्दी जमली होती …  गजानन महाराजांनी पंढपुरात भक्त बापू काळे यांना पाटील यांच्या वाडय़ात (मठात) विठ्ठल रूपात दर्शन दिले होते , तेव्हापासून जे भक्त श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यास पंढरपूरला जाऊ शकत नाहीत ते भक्त सरळ गजानन महाराजांच्या पंढरीत येऊन गजानन महाराजांना विठ्ठल रूपात पाहून नतमस्तक होतात….  नाम विठ्ठलाचे घ्यावे, पाऊल पुढे टाकावे … गण गण गणात बोते, हे भजन श्री हरीचे…. तर दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे असे  म्हणणे आहे कि , ते बर्याच वर्षापासून येत असून घरात सुख शांती राहते , गजानन बाबांचे नाव घेतले कि ,कोणतेही काम  पटकन होते, तर बाबांचे नाव घेताच आजार हि  होता , शिवाय चेह्र्य्वर आनद हि राहतोय ,अशी बाबांचे प्रती भाविकांची अपर श्रद्धा असून गजानन बाबा चे दर्शनसाठी परिसरातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातून भाविक येतात … म्हनुअनच ह्याला प्रती पंढरपूर म्हणून सुद्धा ओळख्ल्के जातेय ।   दरवर्षीप्रमाणे  शहरातून श्रींच्या पालखीची दुपारी २ वाजता नगर परिक्रमा करण्यात आली.. गज, अश्‍व, श्रींच्या रजतमुखवट्यासह शहर परिक्रमा करण्यात आली… . यावेळी सोहळ्यासाठी संतनगरीत भाविक भक्तांची मांदियाळी फुलली होती… संस्थांच्या वतीने आषाढी एकादशीचा उत्सवही थाटामाटात व हजारो भक्तांच्या साक्षीने साजरा केल्या जातो….हे विशेष …

 

-->