* राजे संभाजी महाराज जयंती निमित्य युवकांची निघाली मोटरसायकल रॅली*राजेंच्या जयघोषात दुमदुमली रजत नगरी, तर सम्पूर्ण शहर ही झाले भगवामय.*मराठा पाटिल युवक समिति च्या वतीने संभाजी राजे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी *

ph2

PH1

छत्रपती संभाजी राजे यांची जयंती संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरी होत असताना  बुलडाणा जिल्ह्यात देखील मराठा पाटिल युवक समिति च्या वतीने संभाजी राजे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलीय … खामगाव येथे सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या ला हारार्पन करुण मोटारसायकल रॅली ला सुरुवात करण्यात आली… युवकानी काढ़लेले मोटर सायकिल  रॅली संपूर्ण शहरामधुन परिक्रमा करुण राजे शिवाजी आणि संभाजी यांचा जयघोष करत शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना वंदन करत ऋषिसंकुल येथील संभाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ रॅली चे विसर्जन करण्यात आले… यावेळी जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनेचे हजारो कार्यकर्ते आणि युवक  रॅलीमध्ये मोठ्या संखेने  सहभागी झाले होते… तर राजे संभाजी च्या  जयघोषाणे रजतनगरी दुमदुमुली होती… शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या वेशभूषेत असलेले तरुण हे या मोटर सायकल रेलिचे विशेष आकर्षण ठरले.. तर जयंती उत्साहाने सम्पूर्ण शहर ही भगवामय झालेले होते..

ph2

-->