*खारपाण पट्ट्यासाठी पाच हजार कोटींचा प्रकल्‍प -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..** गाडेगावच्या शेततळ्यांची पाहणी *सामुदायिक शेती करण्याचे आवाहन*

DDI_0861

DDI_0861DDI_0943

बुलडाणा, दि. 6 : खारपाण पट्टा क्षेत्रातील जमिनीची सुधारणा करण्यासाठी राज्य शासन पाच हजार कोटी रूपयांचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्‍ह्यातील गाडेगाव बु. ता. जळगाव जामोद येथील शेततळ्यांची पाहणी केली. दरम्यान मुख्यमंत्री यांनी श्री. कलंत्री यांच्या शेतावर उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला.मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, खारपाण पट्ट्यातील शेतीला डार्क झोनमधून काढून शेतीची सुपिकता वाढविण्यावर राज्य शासन भर देत आहे. कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून खारपाण पट्ट्यातील मातीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी पाच हजार कोटी रूपयांचा प्रकल्प राज्य शासनाने हाती घेतला आहे. या प्रकल्पाच माध्यमातून जमिनीचा पोत सुधारून शेतकऱ्यांना नीट शेती करता यावी, यासाठी प्रयत्न केले जातील.शेतीच्या छोट्या-छोट्या तुकड्यांमुळे शेतीची सुधारणा आणि गुंतवणूक करणे शक्य नाही. त्यामुळे राज्य शासन सामुदायिक शेतीचा प्रकल्प अंमलात आणत आहे. यासाठी किमान 20 शेतकरी आणि 100 एकर शेती असणे आवश्यक आहे. या एकत्रित झालेल्या सर्व शेतीमध्ये राज्य शासनाच्या सर्व योजना एकत्रितरित्या राबविण्यात येतील. ठिंबक सिंचन, शेडनेट, फळबागा अशा विविध योजनांच्या माध्यमातून 50 लाख रूपयांची गुंतवणूक या सामुदायिक शेतीमध्ये होणार आहे. शेतीतील गुंतवणुकीमुळे भविष्यात शेतीचे उत्पन्न चार पट वाढविणे शक्य आहे. हा प्रयोग यशस्वीरित्या राबविल्यास पहिल्याच वर्षी शेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्न मिळेल. त्यामुळे जळगाव जमोद तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गाडेगाव बु. येथील सनुप कलंत्री, आशाबाई कलंत्री, जयनारायण कलंत्री, अनुपकुमार कलंत्री, संतोषकुमार गांधी यांच्या शेतमध्ये जाऊन कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. उपस्थित नागरीकांनी जळगाव जामोद तालुक्यातील सुमारे 45 गावे खारपाण पट्ट्यात येत आहे. या खारपाण पट्टयातील जमिनीची सुधारणा करण्यासाठी नागरीकांनी विनंती. याबाबत मुख्यमंत्री यांनी खारपाण पट्ट्यातील जमिनीची सुधारणा करण्यासाठी शेततळे हा चांगला पर्याय आहे. या पट्ट्यातील नागरीकांनी शेततळ्यांसाठी एकत्रितरित्या समोर येण्याचे आवाहन केले.यावेळी कृषी सहसंचालक सु. रा.सरदार यांनी शेततळे आणि परिसरातील शेतीची माहिती दिली.

-->