*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या 6 मे 2017 रोजी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर…….*

CMDevendra-Fadnavis

CMDevendra-Fadnavis

बुलडाणा, दि‍.5 – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, पंतप्रधान आवास योजना आदी उपक्रमातंर्गत करण्यात येत असलेल्या कामांची पाहणी करणार आहे. तसेच जिल्हा आढावा बैठक घेणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या 6 मे 2017 रोजी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहे.  त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : सकाळी 8.30 वाजता रामगिरी हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने जळगांव जामोद , जि. बुलडाणाकडे प्रयाण, सकाळी 9.30 वाजता जळगांव जामोद येथील हेलिपॅडवर आगमन, सकाळी 9.35 वाजता मोटारीने गाडेगांव बु ता. जळगाव जामोदकडे प्रयाण, सकाळी 9.50 वाजता गाडेगांव बु येथे आगमन व मागेल त्याला शेततळे योजनेतंर्गत घेतलेल्या शेततळ्याची कामाची पाहणी, सकाळी 10 वाजता गाडेगांव बु येथून मोटारीने गाडेगांव खुर्द ता. जळगांव जामोदकडे प्रयाण, सकाळी 10.05 वाजता गाडेगांव खुर्द येथे आगमन व नाला खोलीकरण कामाची पाहणी, सकाळी 10.15 वाजता गाडेगांव खुर्द येथून मोटारीने खांडवी ता. जळगाव जामोदकडे प्रयाण, सकाळी 10.20 वाजता खांडवी येथे आगमन व भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या रिचार्ज शाफ्ट कामाची पाहणी, सकाळी 10.30 वाजता खांडवी येथून आसलगांव ता. जळगाव जामोदकडे प्रयाण, सकाळी 10.35 वाजता आसलगांव येथे आगमन व पंतप्रधान आवास योजनेतील घरकूल कामाची पाहणी, सकाळी 10.45 वाजता आसलगांव येथून मोटारीने जळगाव जामोदकडे प्रयाण,   सकाळी 10.50 वाजता आमदार संजय कुटे यांच्या निवासस्थानी आगमन, सकाळी 11 वाजता मोटारीने श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाकडे प्रयाण, सकाळी 11.05 वाजता श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय प्रांगण येथे आगमन,  सकाळी 11.05 वाजता बुलडाणा जिल्हा आढावा बैठकीस उपस्थिती, दुपारी 1 वाजता श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय प्रांगण येथून मोटारीने हेलिपॅडकडे प्रयाण, दुपारी 1.05 वाजता हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने बाभुळगांव, जि. यवतमाळकडे प्रयाण करतील.

-->