@ राज्यात यंदा सर्वसाधारण पाऊस, भेंडवडची भविष्यवाणी* @ @350 वर्षांपासून या घट मांडणीच्या आधारावर पीक, पाऊस चे भाकीत. @

1OK

1OK2OK

बुलडाणा :(भेंडवळ )— राज्यात यंदा सर्वसाधारण पाऊस पडण्याची भविष्यवाणी बुलडाण्यातील प्रसिद्ध भेंडवडमध्ये वर्तवण्यात आली आहे. जूनमध्ये कमी तर ऑगस्टमध्ये सर्वाधिक पावसाचं भाकित वर्तवण्यात आलं आहे.पिकांबाबत काय आहे भेंडवडची भविष्यवाणी?*तुरीचं वर्तमान वर्षासारखा भरपूर उत्पादन होणार नाही**कापसाचं सर्वसाधारण पीक येईल. मात्र, काही भागात कापसाचं जास्त, तर काही भागात कमी उत्पादन येईल.**ज्वारीचं उत्पादन साधारण राहील. मात्र, भावात तेजी-मंदी राहील.**बाजरीचे पीकही साधारणच राहील.**तिळाचे पीक साधारण राहीलय माच्क. पण भाव वधारेल.*पावसाबाबत काय आहे भेंडवडची भाकीत   *जून महिन्यात कमी पाऊस पडेल.*
*जुलै महिन्यात पाऊस साधारण पाऊस असेल. मात्र, जूनपेक्षा जास्त पडेल.**ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस पडेल.**सप्टेंबर महिन्यात जून महिन्यासारखाच कमी पाऊस पडेल.**अवकाळी पाऊस भरपूर होईल.*राजकीय क्षेत्राबद्दल काय आहे भेंडवडची भविष्यवाणी?राजा कायम आहे, पण त्याच्यासमोर अडचणी अनेक येतील.गादीवर खडे दिसत असल्यामुळे राजाला संकटाचा सामना करावा लागेल. मात्र, राजा टिकून राहील.देशाला चलन तुटवड्याचा सामना करावा लागेल.घुसखोरी अनेक वेळेला होईल, पण भारतीय सैन्य त्याला सडेतोड उत्तर देतील.काय आहे ‘भेंडवड भविष्यवाणी’?पर्जन्यमान, पिकांची स्थिती, शेतीमालाचे दर, देशातील राजकीय आणि आर्थिक स्थितीबाबत भेंडवडमध्ये दरवर्षी भविष्यवाणी करण्यात येते. गेल्या 350 वर्षांपासून या घट मांडणीच्या आधारावर वर्षभराचं राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि हवामानाचं भविष्य वर्तवलं जातं.दरवर्षी अक्षयतृतीयेला घट मांडले जातात आणि दुसऱ्या दिवशी भविष्य वर्तवण्याची पद्धत आहे. सूर्यभान महाराजांनी ही प्रथा सुरु केली. आता त्यांचे वंशज भविष्य वर्तवण्याचं काम करतात.
3OK

 

-->