*टिळक राष्ट्रीय विद्यालयात योगा व प्राणायाम शिबीर*

yogyog

बुलढाणा टुडे उपडेट –खामगांव दि १२—–
खामगाव येथील ऐतिहासिक व प्रसिद्ध असलेल्या टिळक राष्ट्रीय विद्यालयात योगा व प्राणायाम शिबीराचे आयोजन मुले मुली, पुरूष व महिला यांच्यासाठी दि. १५ एप्रिल ते १५ मे २०१७ या कालावधीत सकाळी ६. ०० ते ७.३० वा. संस्थेच्या पंचवार्षिक शताब्दी महोत्सवानिमित्य करण्यात आले आहे. याशिवाय १० वी १२ वी च्या  विद्यार्थ्यासाठी व सरकारी कर्मचारी यांचेसाठी इंग्लिश स्पिकींग कोर्स सकाळी ८.०० ते ९.०० , गायन, वादन, चित्रकला, सकाळी ९.०० ते ११.०० यावेळात कलेची आवड असणारास शिकता येईल. दुपारी ४.०० ते ५.०० वा. मुक्तहस्त रांगोळी महिलासाठी तर दुपारी ४.०० ते ६.०० या वेळेत संगणकाचे विशेष प्रशिक्षण देण्यात येईल. एका किंवा सर्व प्रशिक्षणात सहभाग घेता येईल. सर्व प्रशिक्षण विशेष प्रशिक्षकाद्वारे देण्यात येईल व प्रशिक्षण पूर्ण करणारास प्रमाणपत्र देण्यात येईल. अधिक माहीतीसाठी मुख्याध्यापक डॅा पी आर उपर्वट यांच्याशी ९८५०२८११५० वर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मधुसूदन गाडोदिया यांनी केले आहे.

 

-->