*जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अंदाजे सरासरी ६६.६१टक्के मतदान*

vote2

vote2

बुलढाणा टुडे इलेकशन उपडेट —निवडणूक विभागाकडून प्राप्त अंतिम तालुकानिहाय  मतदान टक्केवारी  (अंदाजे)

  •  जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी, सर्वत्र शांततेत मतदान

बुलडाणा, दि. 16 :  जिल्हयात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज  गुरुवार , 16 फेब्रुवारी  २०१७  रोजी मतदान शांततेत पार पडले. निवडणूक जिल्हा परिषदेच्या ६० गट आणि पंचायत समितीच्या १२० गणाकरिता १६८१ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. या निवडणुकीकरिता जिल्ह्यात  सरासरी ६६.६१ टक्के मतदान झाले.  या मतदानाला सकाळी ७.३० वाजेपासून सुरुवात झाली. मतमोजणी २३ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे.

जिल्हाधिकारी विजय झाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांनी  बुलडाणा, खामगाव,  मलकापूर, नांदुरा आदी ठिकाणी पाहणी दौरा केला. कायदा व सुव्यवस्थेची माहिती घेतली.  सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी आढावा घेऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली.  त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनानेही आपली भूमिका चोख पार पाडली.

खामगाव – ६९%, बुलडाणा – ६३, सिंदखेड राजा – ६३, मेहकर – ६६, लोणार – ६५, मलकापूर – ६६, नांदुरा – ६९, जळगाव जामोद – ७०, मोताळा – ६२,  चिखली – ६७, संग्रामपूर – ६७,  शेगाव – ७१,  देऊळगाव राजा – ६८ %.  अशाप्रकारे अंदाजे सरासरी – ६६.६१ टक्के मतदान. तालुकानिहाय जिल्हापरिषद गट, पंचायत समिती गण, मतदार संख्या आणि मतदान केंद्र

जळगाव जामोद: जिप गट , पं. गण , मतदार संख्या ८४४६२, मतदान केंद्र ९३.संग्रामपूर: जिप गट ,पं. गण , 

मतदार संख्या८६५२८, मतदान केंद्र ९३.शेगाव : जिप गट , पं. गण , मतदार संख्या ६३८८३, मतदान केंद्र ७७. नांदुरा: जिप गट , पं. गण ,मतदार संख्या ९४२३९,

 मतदान केंद्र ११७. मलकापूर: जिप गट , पं. गण , मतदार संख्या ८०२५७, मतदान केंद्र ८०.मोताळा: जिप गट ,पं. गण , मतदार संख्या ११४७६५, मतदान केंद्र १२८. खामगाव: जिप गट , पं. गण १४, मतदार संख्या १५३६४२, मतदान केंद्र १८७.मेहकर: जिप गट  , पं. गण १२, मतदार संख्या १६२३२९, मतदान केंद्र २०३. चिखली: जिप गट , पं. गण १४, मतदार संख्या१७२२८८, मतदान केंद्र २००. बुलडाणा जिप गट , पं. गण १२, मतदार संख्या १७०४६०, मतदान केंद्र १८० देऊळगाव राजा: जिप गट , पं. गण , मतदार संख्या ७२०७५, मतदान केंद्र ८७. सिंदखेड राजा जिप गट , पं. गण १०, मतदार संख्या ११९०५२, मतदान केंद्र१३६ . लोणार: जिप गट , पं. गण , मतदार संख्या ९४२०१, मतदान केंद्र १३६.

 अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण जिप गट ६०, पं. गण १२०,मतदार संख्या १४६८१७९, मतदान केंद्र १६९१.

vote2

-->